श्री मानसीश्वरच्या जत्रौत्सवात पूजा साहित्याची विक्री करुन नवाबाग शाळेच्या स्काऊट गाईड व कब बुलबुल पथकाच्या मुलांनी ख-या कमाईचा आनंद लुटला. भाविकांनीही मुलांकडील साहित्य खरेदीस प्राधान्य दिले. या पथकामध्ये तन्मय मोर्जे, अथर्व तारी, प्रज्ञा आरावंदेकर, तनिष गिरप, दिपराज तांडेल, मैथिली केळुसकर, प्रांजल मसुरकर, रामकृष्ण कुबल, भाग्येश जाधव, रामचंद्र तांडेल, निरज मोर्जे, अश्विन मोटे, गाथा कोळंबकर, धीरज मोर्जे, विरेन तांडेल, चिन्मई मोर्जे, ओंकार केळुसकर आदींचा समावेश होता. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका तथा गाईड कँप्टन तन्वी रेडकर, कब मास्टर रामा पोळजी, शिक्षिका प्राजक्ता आपटे, शिक्षक मारुती गुडुळकर यांनी परिश्रम घेतले. तर शा.व्य.समिती अध्यक्ष दादा केळुसकर, उपाध्यक्ष दत्ताराम कोळंबकर, वसंत तांडेल, मनोहर तांडेल व पालकांचे सहकार्य लाभले. या उपक्रमास सिधुदुर्ग स्काऊट-गाईड संघटक गायकवाड, मिशाळ, माजी जि.प.सदस्य दादा कुबल, शिक्षक व विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.