मैत्री८९ तर्फे पत्रकार कौलगेकर यांचा सन्मान

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कौलगेकर यांना जाहीर झाल्याबद्दल रा. कृ.पाटकर हायस्कूल मैत्री ८९ या ग्रुपच्यावतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

      रा.कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्लामधील माजी विद्यार्थी मैत्री ग्रुप ८९ तर्फे उभादांडा येथील हॉटेल नार्वेकर सभागृहात येथे आयोजित मैत्रीपूर्ण स्नेहमेळाव्यात शैक्षणिकसामाजिकपत्रकारिताबॅकींग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह दिव्यांग चित्रकार यांच्या यशस्वितेबद्दल गौरवार्थ सन्मान करण्यात आला. यात मठ शाळा नंबर २चे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक चंद्रकांत सावंतपोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी व ग्राफिक नियंत्रण याबद्दल वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधवअपंग चित्रकार पूजा धुरी व पत्रकार सुरेश कौलगेकर यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या लोकांचा समावेश होता.

      यावेळी रमेश पिंगुळकरवेतोरे सातेरी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व संचालक प्रभाकर नाईककॅनरा बँक मॅनेजर श्री. आंबेरकर८९ बॅचचे माजी विद्यार्थी अमर दाभोलकरअविनाश शिरोडकरकमलेश सामंतहितेंद्र रेडकरबापू नाईकहरिश्चंद्र शिरसाठरायाजी सातोस्करसंदीप केळजीमुनाफ जाफरकादर दोस्तीरणजित आचरेकरसमीर गावडेआनंद गावडेरूपेश तांडेलसचिन नवारराणी मडकईकरमंगेश मलबारीसचिन बोवलेकरसुहास मांजरेकर आदी उपस्थित होते. पाटकर हायस्कूलचे शिक्षक महेश बोवलेकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

Leave a Reply

Close Menu