साक्षी बोवलेकर संचलित ओम योग साधनातर्फे १२ मार्च रोजी महिला दिनानिमित्त साई दरबार येथे कार्यक्रम घेण्यात आला. ओम योग साधनेच्या ५३ योग साधकांनी विविध नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले.
उद्घाटन मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. सुमषा प्रभूखानोलकर, सीमा नाईक, साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांच्या हस्ते झाले. कोरोनामध्ये आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले. त्यातून आपल्या जिल्ह्यात आरोग्य सुविधा व्हेंटिलेटरवर असताना तज्ज्ञ योगशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणे हे खुप भाग्याचे आहे. पारंपरिक प्रविण योग, अॅडव्हान्स विनयास योगा, पॉवर योगा, वजन कमी किवा वाढविण्यासाठी योग्य आहारा सोबत स्लीम स्मार्ट साधना, गर्भसंस्कार, अॅडव्हान्स मेडिकल योग थेरपी अशा विषयात प्राविण्य मिळविलेल्या साक्षी बोवलेकर यांनी आपले हे ज्ञान सर्व महिलांकरीता ज्ञानार्जनाच्या माध्यमातून देऊन त्यांनाही सुदृढ बनवित आहेत असे प्रतिपादन अॅड.प्रभूखानोलकर यांनी केले. यावेळी घेतलेल्या लकी ड्राॅमध्ये प्रेक्षकांमधून रेखा नाईक यांना पॉप्युलर क्लॉथ स्टोअर्सचे मालक अमर दाभोलकर पुरस्कृत पैठणी मान्यवरच्या हस्ते प्रदान करण्यात आली.