सावंतवाडी वनविभागाच्यावतीने वायंगणी बीच येथे २५ व २६ मार्च कालावधीत ‘वायंगणी कासव महोत्सव‘ संपन्न झाला. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झाले. शासनाने वनखात्यामार्फत २००३ पासून स्थानिक किनायावरील नागरिकांना कासव संवर्धनासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे सन २०१८-१९ मध्ये ३००० कासवे समुद्रात सोडली गेली. त्यानंतर सन २०२१-२२ मध्ये त्यांची संख्या २१ हजार झाली. म्हणजे कासवच्या संवर्धन व जतनमध्ये वनखात्याची प्रगती दिसून येते. कासव जतन व संवर्धन जनजागृती अंतर्गत पर्यटन महोत्सव पुढील वर्षी आयोजित करावा, त्यासाठी शासनामार्फत सहकार्य केले जाईल असे के.मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले. यावेळी कुडाळ वनक्षेत्रपात अमृत शिदे, तहसिलदार प्रविण लोकरे, बेस्ट पॉवर लिफ्टर अनुजा तेंडोलकर, डॉ.एस.एम.रोहिदास, कांदळवन कक्षाच्या उपजीविका तज्ज्ञ दुर्गा ठिगळे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट, माणगांव वनपाल श्रेया परब, नेरुर वनपाल धुळुप मेतर, गोठोस वनपाल महेश पाटील, वनकर्मचारी शंकर पाडावे, राहूल मयेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी वन विभागाच्यावतीने वायंगणी बीच येथे आयोजित केलेल्या ‘कासव महोत्सव वायंगणी २०२३‘ वायंगणी-हुलमेकवाडी किनायावर ऑलिव्ह रिडले कासव जातीने लावलेल्या ४ घरट्यांतून ४१५ कासव पिल्ले बाहेर आली. सदरची पिल्ले सिधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे हस्ते व कोल्हापूरचे जीएसटी कमिशनर शबरीश पिलाई, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, वेंगुर्ला मुख्याधिकारी परितोष कंकाळ, गोव्याचे पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर, सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिदे यांच्या उपस्थितीत सागरी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. कासव जतन व संवर्धनासाठी मेहनत घेऊन काम करणाया मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, कासवमित्र घनश्याम तोरसकर, संतोष साळगांवकर, प्रमोद वेळकर, सुरज तोरसकर, शंकर रावले, प्रकाश साळगांवकर, हेमंत शेलटकर, भालचंद्र तोरसकर, प्रकाश खोबरेकर, सुहास तोरसकर आदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन काका सावंत यनी केले.