राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी संफ कार्यालयात दाभोली ग्रा.पं.च्या उपसरपंच फिल्सुअनिता फर्नांडिस यांच्या समवेत ग्रा.पं. सदस्य सिसीलिया मास्करेनास, एकनाथ राऊत नरेश बोवलेकर, तमास डीसोझा व जॉन मेंडोसा, माजी पं. स.सदस्य समाधान बांदवलकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सचिन वालावलकर, माजी पं.स. सभापती सुनील मोरजकर, कोचरा सरपंच योगेश तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अॅड.नीता सावंत, अनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.
दाभोली ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गावाच्या पर्यटन वाढीसाठी निधी कमी पडू देणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन दाभोलीचा विकास केला जाईल असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले.