अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन

दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये गेली अनेक अत्यावश्यक संगणक कक्षाची आवश्यकता होती. याबाबत शाळेच्या शिक्षक पुढाकारातून तयार केलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटनल सिने अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर अन सिंन कोकणचे प्रॉडक्शन प्रमुख बनी नाडकर्णीमुख्याध्यापक किशोर सोनसुरकरकॅमेरामन अजित रेडेकरव्यवस्थापन अध्यक्ष सुधीर गोलतकरसामाजिक कार्यकर्त्या हेमा गावस्करदीपक पाटीलपवार सर आणि प्लॅनेट मराठी मित्र परिवार उपस्थित होते. यावेळी शाळेमध्ये सुरू असलेल्या कै.शंकर साठे सर स्मृती पेज योजना सुरू केल्याबद्दल दिगंबर नाईक यांनी कौतुक केले. मालवणी पेज ही मालवणी परंपरेची ओळख आणि गरज असल्याचे नाईक यांनी सांगितले. भविष्यात या शाळेची प्रगती होण्याच्या दृष्टीने शाळेत सुरू असलेले विविध उपक्रम कौतुक करून दिगंबर नाईक यांनी प्रसिद्ध मालवणी भाषेतील गा-हाणे घातले.

Leave a Reply

Close Menu