राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाळा नं.३ मध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत सर्वेश विकास मेस्त्री याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. ही स्पर्धा लिनेस क्लब वेंगुर्ल्याच्यावतीने घेण्यात आली होती. स्पर्धेत द्वितीय-सुरेंद्रकुमार रामप्रकाश प्रजापती, तृतीय-मान्यता संदिप पेडणेकर, चतुर्थ-श्रावणी राजेंद्र सूर्यवंशी तर पाचवा-कस्तुरी नारायण बघेल यांनी प्राप्त केला. विजेत्यांना लिनेस क्लबच्यावतीने गौरविण्यात आले. यावेळी अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, मंदाकिनी सामंत, निला यरनाळकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक सावंत, शिक्षक राऊळ, भोईसर, सातपुते, सावंत आदी उपस्थित होते.