वेंगुर्ला तालुक्यात जे खेळ खेळले जातात त्या सर्व खेळांचे साहित्य आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यासाठी आपण दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. क्रीडा क्षेत्रातूनच मी पुढे आलो असल्याने आपण याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व उमेश येरम यांनी वेंगुर्ला क्रीडा केंद्र येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी दिली.
यावेळी स्पर्धेचे पंच प्रविण वेर्णेकर, किशोर सोनसुरकर, संदेश रेडकर, नित्यानंद वेंगुर्लेकर यांच्यासह नदन वेंगुर्लेकर, बबन घोडेपाटील, पुंडलिक हळदणकर, संजिवनी परब, जयवंत चुडनाईक, श्री.वाले, श्री.पाटील उपस्थित होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा व्हाव्यात तसेच आवश्यक ते क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे नंदन वेंगुर्लेकर यांनी स्पष्ट केले. संजय परब यांनी आभार मानले.