‘अमृत कलश यात्रेला‘ उत्स्फूर्त प्रतिसाद

मेरी मिट्टी मेरा देशउपक्रमा अंतर्गत वेंगुर्ला पंचायत समिती आणि शिरोडा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोडा येथे काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुक्यातील सर्व गावामधून आलेल्या अमृत कलशामधील माती एकत्र करून अमृत कलशची यात्रा शिरोडा गावातून काढण्यात आली आणि हा कलश वेंगुर्ला पंचायत समितीच्या स्वाधीन करण्यात आला.

      या यात्रेमध्ये शाळेतील विद्यार्थी यांनी राष्ट्रगीत, समूहगीत, पथनाट्य, अंगणवाडी सेविका यांनी लेझिम नृत्य सादर केले. यावेळी पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी पूनम राणे, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, माजी आमदार शंकर कांबळी, माजी उपसभापती सिद्धेश परब तसेच वेंगुर्ला तालुक्यातील सर्व ग्रा.पं.चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगट, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पालक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

 

Leave a Reply

Close Menu