निशाण तलाव ओव्हर फ्लो

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे पडलेल्या मुसळधार पावसाने सप्टेंबर अखेरीस निशाल तलाव ओव्हर फ्लो म्हणून पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. स्वयंचलित असलेले गोडबोले गेट जास्त पाऊस पडल्यास पाण्याच्या दाबाने काही प्रमाणात उघडते आणि पाण्याचा दाब कमी झाल्यास परत बंद होते. दरम्यान, यावर्षी निशाण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही असे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले आहे.

   वेंगुर्ला न.प.मार्फत पाण्याची अडचण दूर करण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या संसाधनांचे योग्य नियोजन करण्यात आले. शहरातील सात ठिकाणच्या जुन्या व गळती लागलेल्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या. संपूर्ण शहराची तहान भागविणा­-या निशाण तलावाची भित २.५० मीटरने उंची वाढवून सक्षम बनविण्यात आली. त्यामुळे यंदाच्या पावसाने तलावही पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी टंचाईची समस्या मिटणार आहे.

Leave a Reply

Close Menu