सप्ताहाच्या माध्यमातून सहकार वाढवा! एम.के.गावडे

जिल्हा उद्योग केंद्र ओरोस जिल्हा सहकारी बोर्ड, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काथ्या संस्था येथे सहकार मेळावा घेण्यात आला. उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले व एम.के.गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंधुदुर्ग सहकारी मंडळाचे सुभाष तळवडेकर, तालुका सहकार अधिकारी प्रशांत साळगावकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रकल्प अधिकारी आर.ए.गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे एम.आर.पांचाळ, महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रज्ञा परब, राष्ट्रवादीचे वेंगुर्र्ला शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, सुरज परब, सावित्रीबाई फुले संस्थेच्या प्रविणा खानोलकर, सुरंगी महिला संस्थेच्या सुजाता देसाई आदी उपस्थित होते. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सर्वांनी आज सहकाराच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग करणे आवश्यक आहे. अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन सहकार वाढवून उद्योगाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नत्ती करावी, असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले. श्रीपाद दामले म्हणाले, नवउद्योजकांनी आपल्या कुटुंबाची प्रगती होईल यादृष्टीने शासनाच्या व जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेऊन त्याचा योग्य विनियोग करून उद्योग करावा. सहकारातून छोटे मोठे उद्योग निर्माण झाल्यास भारत देश आणखी प्रगती करेल असे श्रीपाद दामले म्हणाले.

Leave a Reply

Close Menu