सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर ‘विशेष निमंत्रित‘ सदस्य म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व शिवसेनेचे सिधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालवलकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नि.भा. खेडकर यांनी त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीत सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीत क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ५ व्यक्तींना ‘विशेष निमंत्रित‘ म्हणून सिधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येते. मंत्रालयात उच्च अधिकारी वर्गातही सचिन वालावलकर यांचा चांगला परिचय असून या परिचयाचा वापर त्यांनी वेंगुर्ल्याच्या विकासासाठी करून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा उपयोग जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी निश्चितपणे होणार आहे. या निवडीबद्दल दिलीप गिरप व सचिन वालावलकर यांचे अभिनंदन होत आहे.