जादा निधी मिळण्यासाठी जास्त मताधिक्य द्या-केसरकर

पर्यटनाच्यादृष्टीने पुढे येणारा काळ हा वेंगुर्ला तालुक्याचा असणार आहे. वेंगुर्ल्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे स्मारकबॅ.नाथ पै यांचे स्मारक उभे राहिले आहे. तुमचा आर्थिक विकास झाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही आणि म्हणून ही निवडणूक विकासाची लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई आपल्याला जिंकायलाच लागेल आणि त्यामध्ये सावंतवाडी मतदार संघाचे मताधिक्य हे सर्वात जास्त असले पाहिजे. नारायण राणे यांना सुद्धा वाटलं पाहिजे की या मतदारसंघातील लोकांनी आपल्याला प्रेम दिलेले आहे आणि मंत्री म्हणून निधी देताना सुद्धा ज्यादा चा निधी हा आपल्या मतदार संघाला मिळायला पाहिजे. शिवसेनेची युती ही बाळासाहेबांनी तयार केलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये युतीचे चिन्ह हे कमळ आहे जे गैरसमज करून देतात त्याचे जाहीर उत्तर मी वेंगुर्ल्याच्या माणिक चौकात जाहीर सभा घेऊन देणार असल्याचा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे बोलताना दिला.

      रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षण मंत्री यांनी ३० एप्रिल रोजी वेंगुर्ला शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाटीभेटी घेतल्या. यावेळी केसरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

      श्री वेतोबाच्या वाढदिवसानिमित्त म्केसरकर यांनी वेतोबाचे दर्शन घेतले. यानंतर वडखोल येथील प्रभाकर पडते यांच्या निवासस्थानीसातेरी मंदिर येथील सुशील परब यांच्या निवासस्थानी व नंतर दाभोसवाडा येथील बाबी रेडकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकरजिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरपशिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकरजिल्हा संघटक सुनील डूबळेशहर प्रमुख उमेश येरमभाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकरशिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकरयुवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरेभाजप युवमोर्चा तालुकाप्रमुख प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते.

      पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणालेप्रगतीच्या दिशेने वेंगुर्ला तालुका वाटचाल करत आहे. झुलत्या पुलामुळे नवाबाग समुद्रकिना-यावर सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. ताज प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. आरवली येथील पंचतारांकित हॉटेल सुद्धा पुढील दोन महिन्यात सुरू होणार आहे. तिलारीच पाणी २०० कोटी रुपये खर्च करून वेंगुर्ला शहरापर्यंत आणलेला आहे. निशाण तलावाची उंची वाढवल्यामुळे पुरेसा पाणीसाठा वेंगुर्ला शहराला उपलब्ध आहे. असेही केसरकर यावेळी म्हणाले.

                  विनायक राऊतांवर टीका

      काहीतरी येऊन भाषण करायचीकाहीतरी शिवराळ भाषेत बोलायचं याला कोकण म्हणत नाहीतआणि ही शिवराळ भाषा कदाचित एका राऊतांकडून दुसरे राऊत शिकले असतील असे मला वाटते. आडनाव सारखं असलं म्हणून तसं घाणेरडे बोलले पाहिजे असं नाही. ताटामध्ये घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला नाही अशी टीका दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर केली.

Leave a Reply

Close Menu