दहावीत वेंगुर्ला तालुक्यातून परुळे हायस्कूलची अर्पिता अमेय सामंत प्रथम 

तालुक्यातील 19 पैकी 17 शाळांचा निकाल 100 टक्के

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्याचा निकाल 99.71 टक्के एवढा लागला. तर तालुक्यात अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेच्या अर्पिता अमेय सामंत हिने 99.40 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर स.का पाटील विद्यामंदिर केळुसच्या गायत्री विवेकानंद बागलकर हिने 98.20 टक्के गुण मिळवत द्वितीय तर वेंगुर्ला हायस्कुलच्या प्रतीक्षा अशोक आरोलकर हिने 97.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. वेंगुर्ला तालुक्यातून एकूण 707 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यात एकूण 19 शाळा पैकी 17 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.

: तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली – हायस्कुलमधील 16 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम कशिश उदय कोनकर 423 गुण (84.60टक्के), द्वितीय हेतल दिनेश कोंडुरकर 397 गुण (79.40 टक्के), तृतीय राखी मंगेश टेमकर 395 गुण (79 टक्के)

वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला – परीक्षेला बसलेल्या 104 विद्यार्थ्यांपैकी 103 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 99.03 टक्के निकाल लागला. यात प्रथम प्रतीक्षा अशोक आरोलकर 97.80 टक्के, द्वितीय दुर्वा संदीप परब 95.60 टक्के, तृतीय द्राम हनुमंत लाड व यशस्वी दत्तप्रसाद परब 95.40 टक्के.

आर.के. पाटकर हायस्कूल – सर्व 41 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम विनोद चव्हाण 466 गुण (93.20 टक्के), द्वितीय निखिल हळदणकर 465 गुण (93 टक्के), तृतीय करण कारंगूटकर 452 गुण (90.40 टक्के)

      न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा – सर्व 36 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. प्रथम श्रुती श्रीधर शेवडे 472 गुण (94.40 टक्के), द्वितीय दीपेश जयराम वराडकर 463 गुण (92.60 टक्के), तृतीय योजना रावजी कुर्ले 449 गुण (89.80टक्के) 

      सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल – सर्व 47 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम निधी सुहास पालकर 93.60 टक्के, द्वितीय चिन्मय नारायण पेडणेकर 91.60 टक्के, तृतीय साक्षी आदित्य प्रभूखानोलकर व मोहन रामचंद्र मालवणकर 90.40 टक्के

      मदर तेरेसा स्कूल –  सर्व 40 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम स्नेहा राजन नार्वेकर 96 टक्के , द्वितीय जागृती दिनेश तुळसकर 91.40 टक्के, तृतीय आयुष जगदीश कुमावत 88.80 टक्के.

      न्यू इंग्लिश स्कुल मातोंड हायस्कूल – सर्व 13 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम रती रामचंद्र हरमलकर 411 गुण (82.20 टक्के), द्वितीय तनिष्का कृष्णा गोसावी 379 गुण (75.80 टक्के), तृतीय सहदेव राघोबा सावंत 366 गुण (73.20 टक्के)

      अणसूर-पाल हायस्कूल – सर्व 32 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन  100टक्के निकाल लागला. यात प्रथम मंदार बापू नाईक 475 गुण (95 टक्के), द्वितीय यज्ञेश भास्कर गावडे 465 गुण (93 टक्के), तृतीय भूमिका अनंत राऊळ 441 गुण (88.20 टक्के)

      शिवाजी हायस्कूल, तुळस – सर्व 24 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम हर्षदा बाळकृष्ण होडावडेकर 461 गुण (92.20टक्के), द्वितीय पुष्कर विजय पेडणेकर 454 गुण (90.80 टक्के), तृतीय वेदिका हरी तांबोस्कर 439 गुण (87.80 टक्के)

      श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे-  सर्व 74 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम कीर्ती विजय कुंभार 475 गुण (95 टक्के), द्वितीय आर्या प्रकाश आरोलकर 463 गुण (92.60 टक्के), तृतीय कानू किशोर धुरी 460 गुण (92 टक्के)

      रा. धो. खानोलकर हायस्कूल, मठ-  सर्व 17 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम श्रावणी प्रशांत धुरी 469 गुण (93.80 टक्के), द्वितीय प्राची संतोष दाभोलकर 451 गुण (90.20 टक्के), तृतीय भाविक विनायक आईर 439 (87.80 टक्के)

      कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली –  सर्व 25 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम माधवी बाबुराव धर्णे 412गुण (82.40 टक्के), द्वितीय अर्पिता घनश्‍याम राणे 373 गुण (74.60 टक्के), तृतीय अपूर्वा उदय धर्णे 360 गुण (72 टक्के)

      अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा-  एकूण 85 पैकी 84 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 98.80 टक्के निकाल लागला. यात प्रथम सलोनी नितीन बागवे 476 गुण (95.80 टक्के), द्वितीय नरेश मंगेश कांबळी 471 गुण (94.80 टक्के), तृतीय अथर्व अभिजित सोनसुरकर 466 गुण (94.20 टक्के)

      श्री माऊली विद्यामंदिर, रेडी – सर्व 19 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रिया गणेश वारखंडकर 431 गुण (86.20 टक्के), द्वितीय भारती अंशिका राजेशकुमार 426 गुण (85.20 टक्के), तृतीय शुभम विष्णू रेडकर 416 गुण (83.20 टक्के)

      श्री सरस्वती विद्यामंदिर आरवली टांक-  मधील सर्व 15 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल निकाल लागला.  यात प्रथम राहुल रामचंद्र कावळे 436 गुण (87.20टक्के), द्वितीय दत्ताराज विनोद टेमकर 430 गुण (86 टक्के), तृतीय प्रथमेश प्रदिप नाबर 406 (81.20 टक्के)

      आसोली हायस्कूल, आसोली – 16 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम नमिता भरत गावडे 88.80 टक्के, द्वितीय आदित्य नारायण पाटील 80 टक्के, तृतीय वैशाली सोमनाथ नाईक 74.60 टक्के

      स. का. पाटील केळुस – सर्व 33 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम गायत्री विवेकानंद बागलकर 98.20 टक्के, द्वितीय सुमती संतोष गोसावी 91.20 टक्के, तृतीय कौकीक रवींद्र वझरकर 89.80 टक्के

      अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे- 42 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम अर्पिता अमेय सामंत 497 गुण (99.40 टक्के), द्वितीय दिशा शंकर परब 479 गुण (95.80टक्के), तृतीय शाल्मली शंकर घोगळे 453 गुण (90.60 टक्के)

      मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी- सर्व 29 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला. यात प्रथम प्रांजली नितीन परब 90.20 टक्के, द्वितीय शर्वरी गजानन डुबळे व तन्वी आनंद तांडेल 90 टक्के, तृतीय अथर्व दिनेश तोरस्कर 89.60 टक्के.

Leave a Reply

Close Menu