जिल्हा बँकेत गुंतविलेली रक्कम सुरक्षित

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची तुळसुली शाखा नुतन वास्तुमध्ये स्थलांतरीत करण्यात आली. स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोर्ये, घावनळे विकास संस्थेचे अध्यक्ष सखाराम खोचरे, माणगांव विकास संस्थेचे अध्यक्ष अविनाश राणे, तुळसुली सरपंच मिलिद नाईक, घावनळे सरपंच आरती वारंग, उपसरपंच दिनेश वारंग, आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री, केरवडे तर्फ माणगांव सरपंच श्रिया ठाकूर, तुळसुली पोलीस पाटील संतोष वेंगुर्लेकर, दाजी धुरी, विजय उमळकर, अनिल खोचरे, चंद्रकांत कर्पे, बाबा वारंग, आनंद वारंग, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, तुळसुली शाखा व्यवस्थापक दत्ता कोरगांवकर, तालुका विकास अधिकारी श्याम सरमळकर, विकास अधिकारी विलास धुरी, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच तुळसुली गावचे ग्रामस्थ, ग्राहक, ठेवीदार उपस्थित होते.

      जिल्हा बँक ही आपल्या सगळ्यांची आहे आणि ती आपली आहे असे समजुन ती वाढवण्यासाठी, मोठी होण्यासाठी आणि तिचा विस्तार होण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा. बँकींग क्षेत्रात जेवढ्या सुविधा आज उपलब्ध आहेत त्या सर्व सुविधा आज जिल्हा बँक देत आहे. आपण आत्तापर्यंत जो विश्वास दाखवला आहात तो सार्थ ठरविण्यासाठी आम्ही निश्चितपणे कटीबद्ध आहोत असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.

      आज जिल्ह्यात काही संस्था ठेवीदारांना विविध आमिषे दाखवून ठेवी गोळा करीत आहेत व कालांतराने या ठेवी असुरक्षित होत असून त्याची वसुली करण्यासाठी ठेवीदारांना हेलपाटे मारावे लागत आहेत. म्हणूनच ठेवीदारांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता आपल्या कष्टांनी मिळवलेला पैसा जिल्हा बँकेमध्ये गुंतवावा व हा गुंतवलेला पैसा सुरक्षित ठेवण्याची हमी आम्ही देत असल्याचेही श्री. दळवी यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Close Menu