भाजपातर्फे वेंगुर्ल्यात राणेंच्या विजयाचा जल्लोष

वेंगुर्ला भाजपा कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, सुषमा प्रभूखानोलकर, सुजाता पडवळ, दिलीप गिरप, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडीस, प्रशांत खानोलकर, प्रशांत आपटे, जयंत मोंडकर, रमेश नार्वेकर, स्मिता दामले, श्रेया मयेकर, प्रार्थना हळदणकर, ईशा मोंडकर, वृंदा गवंडळकर, रसिका मठकर, आकाक्षा परब, पपू परब, रवी शिरसाट, तुषार साळगांवकर, भूषण सारंग, कमलेश गावडे, शेखर काणेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. राणेंचा विजय हा पूर्णपणे सिधुदुर्गावरच अवलंबून होता. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठांकडून लाखाचे मताधिक्य देण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे झोकून देऊन काम  करत राणेंना विजय मिळवून दिला. ४५ वर्षानंतर कोकणात कमळ फुलले आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्वच सत्तास्थाने भाजपकडेच राहतील असे कार्य करूया असे आवाहन मनिष दळवी यांनी केले.

 

Leave a Reply

Close Menu