तालुक्यात राणेंना ९ हजार ६६२ मतांचे लीड

लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या विजयात वेंगुर्ला तालुक्यातील मतदानाचा सिहाचा वाटा आहे. वेंगुर्ला तालुक्यात राणेंना २५ हजार ५८५ मते तर विनायक राऊत यांना १५ हजार ९२३ मते मिळाली. तालुक्यातील केवळ सहा मतदान केंद्रे वगळता इतर सर्वच मतदान केंद्रांवर राणेंना मिळालेले लीड मोठे आहे. तालुक्यातील ९३ पैकी तब्बल ८७ मतदान केंद्रांवर राणे यांना ९ हजार ६६२ मतांचे लीड मिळाले. वेंगुर्ला शहरातील ४६ नंबरच्या केंद्रावर राऊत यांना २६१ तर राणेंना २४६ मते, तर ४९ नंबरच्या केंद्रावर राऊत यांना ३४९ तर राणे यांना ३०९ मते मिळाली. शहरातील या दोन्ही केंद्रांवर राऊत यांनी ५५ मतांचे लीड घेतले.

Leave a Reply

Close Menu