आसोली गावातील महिलांच्या ‘झेप‘ प्रभाग संघाच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना अर्चना घारे-परब यांनी विशेष प्रयत्न करून राज्यातील महत्त्वाची असलेली वाशी-नवी मुंबई बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. सुरंगीची फुले व कळ्या या एकत्र करून सुमारे चार टन माल असणारी पहिली गाडी आसोली येथून वाशी बाजारपेठेला रवाना झाली. महिला, भगिनींना रोजगार मिळावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा या हेतूने अर्चना घारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला संघाच्या सचिव रिया धुरी, राष्ट्रवादीचे आसोली गाव अध्यक्ष विक्रांत कांबळी, विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक, युवा अध्यक्ष विवेक गवस, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.