छत्रपती शिवाजी महाराज संघटनेच्या आंदोलनाला यश

शासनाच्या एक रूपयात विमा योजनेंतर्गत गतवर्षी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात पिकाच्या नुकसानीपोटी देय असणारी रक्कम युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे वर्ग केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे.

    लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेशही लागू असल्याने ३१ मे रोजी संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेतले होते. यावेळी ५ जूनपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी संघटनेने केली होती. विमा कंपनीने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने संघटनेने पुन्हा एकदा वेंगुर्ला तालुका कृषी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर काही अवधीतच निधी वर्ग केल्याचे पत्र संघटनेच्या पदाधिका­यांना पाठविण्यात आल्याने संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले.

Leave a Reply

Close Menu