भारतीय जनता पक्षातर्फे भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी प्रसन्ना देसाई, अॅड.अनिल निरवडेकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडीस, पपू परब, सुहास गवंडळकर, सुरेंद्र चव्हाण, दादा केळुसकर, वसंत तांडेल, सोमा मेस्त्री, सत्यवान परब, धर्मराज कांबळी, वामन गावडे, सत्यविजय गावडे, शेखर काणेकर, प्रभाकर गावडे, सचिन गावडे, संदेश गावडे, वैभव होडावडेकर, साईप्रसाद नाईक, प्रफुल्ल प्रभू, श्रीकांत राजाध्यक्ष, प्रसाद नाईक, नारायण कुंभार, प्रशांत खानोलकर, सत्यवान पालव, अजित कनयाळकर, प्रणव वायंगणकर, हितेश धुरी, नंदू गावडे, प्रितम सावंत, भूषण आंगचेकर, प्रशांत बोवलेकर, बंटी गावडे, भुवनेश परब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. जनसेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची, सत्ता नसेल तर जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवायचा हिच भूमिका पक्षाची आहे. जनसेवेसाठी आणि विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले.