किनारपट्टी भागातील २७ कोटींच्या कामांना मंजूरी

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील खाडी व समुद्र किनारपट्टीनजिकच्या गावातील महत्त्वाच्या कामांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे बंदर विकासमंत्र्यांकडून मंजूरी मिळाली आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी वारंवार या कामांचा पाठपुरावा केला होता. वेंगुर्ला तालुक्यातील केळुस-मोबारवाडी जलमाई मंदिर येथे संरक्षण भित बांधण्यासाठी १ कोटी, निवती श्रीरामवाडी येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी, रेडी-तेरेखोल रस्ता भीमनगर येथे संरक्षक भित बांधण्यासाठी १ कोटी, पाल-गणेशकोंड ते अणसूर-पाल पूलापर्यंत खाडीपात्रात धूप प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी, शिरोडा-केरवाडा येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी, परूळे-नेवाळकरवाडी येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी, कर्ली-कोरजाई येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी, कोचरा दत्त मंदिर येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी, रेडी-लिगेश्वर मंदिराजवळ संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी, नवाबाग समुद्रकिनारी संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी, किल्लेनिवती भोगवे येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी, वायंगणी-पोयंडेवाडी येथे खाडीकिनारी संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी अशा एकूण २७ कोटींच्या कामांची मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बंदरविकास मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती. या कामांना मंजूरी देण्याचे आदेश बनसोडे यांनी दिल्याची माहिती सचिन वालावलकर यांनी दिली आहे. 

 

 

Leave a Reply

Close Menu