आमदार डावखरेंकडून झेरॉक्स मशिन उपलब्ध

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी वेंगुर्ला येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाला झेरॉक्स मशीन उपलब्ध करून दिली आहे. सर्वच परीक्षांचे पेपर ऑनलाईन येत असल्यामुळे त्या पेपरची प्रिट काढून विद्यार्थ्यांना देणेयासाठी महाविद्यालयाला अद्ययावत झेरॉक्स मशीनची आवश्यकता होती. ही अडचण लक्षात घेऊन आमदार निरंजन डावखरे यांनी झेरॉक्स मशीन दिल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. या झेरॉक्स मशीनचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसन्ना देसाईसुरेंद्र चव्हाणप्रा.वामन गावडेप्रा.सुनिल भिसे, प्रा.नवात्रेप्रा.के.आर.कांबळेप्रा.जे.वाय.नाईकसंभाजी पाटीलमिनल मांजरेकरखोतरश्मी गावडेसुनिल आळवेमोहन मोबारकर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu