ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत वेतोरे-पालकरवाडी येथे आलेल्या कृषीदूतांनी तेथील शेतक-यांना रक्षक सापळ्याबाबत प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या कृषीदूतांचे वेतोरे-पालकरवाडी येथे आगमन झाले असून नुकतेच विविध प्रकारची किटकनाशके व सापळे तसेच त्यांचा वापर आणि फायदे याबाबत त्यांनी तेथील शेतक-यांना मार्गदर्शन केले. यावेळी पालकरवाडी सरपंच यांच्यासह स्वीकार जाधप, सतिश नागर, ग्यानसिग मीना, अमरदीप वेलीप, शिवमणी भुशीगंपला, अमेय तेंडुलकर, साहिल यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पालकरवाडी गावामध्ये मुख्यतः फळमाशीचा प्रचंड प्रादुर्भाव होत असून यावर उपाययोजना सुचविल्यामुळे सरपंच यांनी कृषीदूतांचे कौतुक केले.