जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी-सावंतवाडी, तालुका कृषी अधिकारी-वेंगुर्ला यांच्या हस्ते दाभोली येथील गुरूनाथ जोशी यांच्या बागायतीमध्ये विविध जातीच्या फणस झाडांची लागवड करण्यात आली. हा कार्यक्रम ३ जुलै रोजी पार पडला.
यावेळी वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी प्रिया गुंड, कृषी सहाय्यक जीवन परब, जीजी नाईक, लाडू जाधव, देसाई, ग्रामसेवक पिगुळकर, प्रगतशील शेतकरी अण्णा जोशी, नंदन बांदवलकर, बाळा हळदणकर, विनायक बांदवलकर, उमेश जोशी, विवेक जोशी, बाळा राऊळ, संध्या गावडे आदी उपस्थित होते. उपस्थित अधिका-यांनी शेतक-यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रास्ताविक अण्णा जोशी, स्वागत प्रभाकर जोशी यांनी तर आभार कृषी अधिकारी देसाई यांनी मानले.