सिधुदुर्गातील शाळांची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० अशी आहे. तर शनिवारी सकाळी ७.३० ते ११ आहे. मात्र, आता शनिवारी सकाळच्या सत्रात भरणाया शाळेच्या वेळेत ६ जुलैपासून बदल करण्यात आला आहे. अनेक जि.प.शाळांमध्ये पहिली ते चौथीबरोबरच पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू आहेत. शनिवार ६ जुलैपासून पुढील प्रत्येक शनिवारी जिल्ह्यातील सर्वच जि.प.शाळांची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ अशी करण्यात आली आहे.