पावसाळ्याच्या कालावधीत वेंगुर्ल्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपजिल्हा रुग्णालयातून मिळाव्यात. या दृष्टीने शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर व शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन सर्व प्रकारची माहिती घेत आलेल्या प्रत्येक रुग्णाला मोफत औषधासह वैद्यकीय सेवा देण्यात यावी असे स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरना व औषध निर्माता यांना आदेश दिले आहेत. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. स्वप्नाली माने-पवार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता केणी, उप अभियंता भगत, अधिपरिचारीका डिसोझा व औषध निर्माता आदी उपस्थित होते.