समान पद्धतीच्या नोंदीमुळे भ्रष्टाचार होणार नाही-मनिष दळवी

केंद्रशासनाने विकास संस्था संगणकीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. या संगणकीकारणाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या समान पद्धतीच्या नोंदी पाहायला मिळतील आणि यामुळे विकास संस्थांमध्ये कोणत्याही पकारचा भ्रष्टाचारअफरातफर पुढच्या काळात होणार नाही. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता सभासदांना कळेल. परिणामी सभासद विकास संस्थांवर विश्वास ठेवून सर्व आर्थिक व्यवहार संस्थेत करू लागतील. म्हणून ही पारदर्शकता आपल्याला निर्माण करायची असल्याचे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.

      सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून साई डिलक्स हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक विकास सेवा सोसायटी संवाद कार्यक्रमात जिल्हा बँक अध्यक्ष बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाबार्ड जिल्हा प्रबंधक दिपाली माळीजिल्हा बँक माजी संचालिक प्रज्ञा परबवेंगुर्ला खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजीसहकार अधिकारी प्रफुल्ल साळगावकरकर्ज विभाग प्रमुख के.बी.वरकसंगणक संस्था प्रमुख श्री.हडकर आदी उपस्थित होते.

      या कार्यक्रमात श्री क्षेत्रपालेश्वर होडावडा सोसायटीने बँक स्थरावर व संस्था स्थरावर या दोन्हीकडे १०० टक्के कर्ज वसुली केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तर बँक स्थरावर ३० जून २०२४ अखेर १०० टक्के वसुली करणा-या वेतोरे सोसायटी (२ कोटी ७९ लाख)मातोंड सोसायटी (२ कोटी ५८ लाख)आडेली सोसायटी (१ कोटी ६३ लाख)मठ सोसायटी (१ कोटी १३ लाख ८७ हजार)होडावडा सोसायटी (१ कोटी १९ लाख)खानोली सोसायटी (७० लाख ७८ हजार)वेंगुर्ला सोसायटी (३६ लाख १६ हजार)आरवली सोसायटी (९५ लाख)केळूस सोसायटी (२३ लाख १४ हजार)उभादांडा सोसायटी (२३ लाख ९४ हजार)पाल सोसायटी (२४ लाख २६ हजार),  रेडी सोसायटी (१३ लाख ४१ हजार)शिरोडा सोसायटी (१६ लाख २६ हजार) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी पुढे बोलताना म्हणालेजिल्हा बँक यावर्षी १४५ कोटी रुपये शेती कर्जाचे वाटप करत आहे. यासाठी सेवा सोसायटी यांनी चांगल्या प्रकारे काम करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात फक्त ४ हजार कोटी उलाढाल होती. आज अडीच वर्षात ती उलाढाल पावणे ६ कोटी रुपयांवर आम्ही नेली आहे. आम्ही ग्राहकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातून ठेवी सहजासहजी जमा होत नव्हत्या आज स्वतःहून लोक ठेवी ठेवण्यासाठी येत आहेत. आपला ग्राहक हा आपला सभासद शेतकरी आहे. त्या गावातील नागरिक आहे. आणि म्हणून त्यांना जर चांगली सेवा देण्यासाठी आपण सुरुवात केली तर हे सर्व सभासद त्यांच्या गरजेच्या वेळी तुमच्याकडे येतीलमदत मागतील व त्यातूनच विकास संस्थांचे आर्थिक उत्पन्न वाढेल. विकास संस्थांच्या सबलीकरणासाठी तसेच सचिव मानधनलाईट बिलस्टेशनरी आदींसाठी हातभार लावण्याचा दृष्टीने पत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक  मदत सलग २ वर्षे जिल्हा बँक मार्फत केली जात आहे. यापुढील काळात चांगली आर्थिक मदत थेट दिली जाणार आहे. असल्याचेही यावेळी श्री दळवी म्हणाले.

    अनेक ठिकाणी विकास संस्था ही स्वतःची मालकी असल्याचे त्याठिकाणचे चेअरमन व सचिव भूमिका घेत  आहेत. विकास संस्था ही इथल्या शेतकयाचे हक्काचे व्यासपीठ आहे त्यामुळे अशा प्रकारची भूमिका कोणत्याही विकास संस्थेची खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही यावेळी मनिष दळवी यांनी दिला.

    या कार्यक्रमात संस्था चेअरमन यांच्या वतीने परुळे सोसायटी चेअरमन निलेश सामंतरेडी सोसायटी चेअरमन चित्रा कनयाळकर तर सचिव यांच्या वतीने होडावडा सोसायटी सचिव राजबा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu