रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाचे अध्यक्ष योगेश नाईक, सचिव प्रथमेश नाईक यांच्या संकल्पनेतून आणि इव्हेंट चेअरमन दिलीप गिरप यांच्या सहकार्यातून १३ जुलै रोजी येथील कालेलकर सभागृहामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित दशावतार मंडळातील प्रसिद्ध कलाकारांच्या कलाविष्काराने सादर झालेले ‘वीर अभिमन्यू‘ हे संयुक्त दशावतार नाटक म्हणजे वेंगुर्लावासियांना पर्वणी ठरले.
वेंगुर्लासारख्या शहरात वातानुकुलीत हॉलमध्ये दशावतार नाटक पहाण्यासाठी पंचक्रोशीतील नाट्यप्रेमींनी भर पावसात सुद्धा उदंड प्रतिसाद देत रोटरीच्या ह्या आगळ्या वेगळ्या उपक्रमास भरभरून दाद दिली. असेच नाविन्य पूर्ण उपक्रम रोटरीच्या माध्यमातून राबवून जनहित साधावे, अशा शुभेच्छा मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिल्या. दिलीप गिरप व राजेश घाटवळ यांनी रोटरीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी मुकुल सातार्डेकर, आनंद बांदेकर, आनंद बोवलेकर, सुरेंद्र चव्हाण, पंकज शिरसाठ, धनेश आंदुर्लेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन राजू वजराटकर यांनी केले.