‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण‘ योजनेची जिल्हा प्रशासनातर्फे प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने आत्तापर्यंत ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने ७७ हजार ४०८ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातून ऑनलाईन पद्धतीने २६ हजार २९२ आणि ऑफलाईन पद्धतीने ४३ हजार ९७६ असे एकूण ७० हजार २६८ अर्ज ग्रामीण भागातून दाखल झाले आहेत. तर शहरी भागामध्ये ऑनलाईन पद्धतीने २९४१ आणि ऑफलाईन पद्धतीने ४१९९ असे एकूण ७४१० अर्ज दाखल झाले आहेत.