कल्पवृक्ष अकॅडमीतर्फे गुरूपौर्णिमा

वेंगुर्ला येथील शासनमान्य कल्पवृक्ष अकॅडमीच्यावतीने गुरूपौर्णिमा उत्सव नृत्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक सुमन निकम, सामाजिक कार्यकर्त्या सिमा नाईक, शिक्षिका रेश्मा वरसकर, कल्पवृक्ष अकॅडमीच्या अध्यक्षा उर्मिला पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नृत्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला कल्पवृक्ष अकॅडमीचे उपाध्यक्ष उत्तम मोबारकर, सचिव उमेश पेडणेकर, खजिनदार रेश्मा शारबिद्रे, वेदांग पेडणेकर, गोपाळ बागायतकर आदी मान्यवर तसेच अकॅडमीचे विद्यार्थी, मठ ग्रामस्थ व हितचिंतक उपस्थित होते. आभार उर्मिला पेडणेकर यांनी मानले.

  

Leave a Reply

Close Menu