रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

     वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ.खर्डेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि एन.सी.सी.विभाग तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला व रक्तपेढी सिधुदुर्गच्या सहकार्याने आयोजित वेताळ प्रतिष्ठानच्या सलग २६ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यात ६३ दात्यांनी सहभाग नोंदविला होता, त्यापैकी ४५ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले.

    सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व रोप देऊन सन्मान करण्यात आला यावेळी  प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, वैद्यकीय अधिकारी डॉ.निखिल शिंदे, अधिपरिचारिका प्रांजली परब, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.डॉ.सचिन परूळकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सिंधु रक्तमित्र वेंगुर्ला शाखा अध्यक्ष लिस्टर ब्रिटो, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, यशवंत गावडे, रक्त संघटक महेश राऊळ, डॉ.पी.आर.गावडे, डॉ.के. आर.कांबळे, प्रा.जे.वाय.नाईक, रवी शिरसाट, शैलेश जामदार, राजेश पेडणेकर, सचिन कोंडये आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सागर सावंत, माधव तुळसकर, सुनील आळवे, सद्गुरू सावंत, मंगेश सावंत, नाना राऊळ, प्रदीप परूळकर, प्रसाद भणगे, विधी नाईक, जान्हवी सावंत, हेमलता राऊळ, सचिन गावडे, सुहास सावंत, चेतन परब यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन  गुरूदास तिरोडकर व आभार सानिया वराडकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu