गेली अनेक वर्षे खेळाडूंना लेदरबॉलचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देणारे सुधीर सारंग आणि संगीत विद्यालयात संगीताचे धडे शिकविणारे निलेश पेडणेकर यांचा त्यांच्या शिष्यांच्या उपस्थितीत गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी अध्यक्ष योगेश नाईक, सेक्रेटरी अॅड.प्रथमेश नाईक, राजेश घाटवळ, ठाकूर कॅश्यू इंडस्ट्रीजचे दिपक ठाकूर, समर्थ क्रिकेटअकॅडमीचे खेळाडू आयुष होडावडेकर, ओम वाडेकर, पार्थ मालवणकर, अनिलश मालवणकर, पलाश वाडेकर, अन्वेश मांजरेकर, वीर नाईक, ऋत्विक शुक्ला आदी उपस्थित होते.