आपल्याला घडविणारी शाळा आणि त्याशाळेचे ऋण फेडणाऱ्या व्यक्ती या मोजक्याच असतात. भला मोठा खर्च असताना आपल्या परिवारांच्या माध्यमातून निधी देत शाळेत दोन वर्ग खोल्या आणि सभागृहाचे काम करुन दिले आणि विद्यार्थ्यांची शाळेत शिक्षण घेतानाची अडचण दूर केली. हा शांताराम नाईक आणि कुटुंबियांचा मोठेपणा आहे असे प्रतिपादन ॲड. अजित भणगे यांनी वेंगुर्ला तालुका स्कूलच्या विठाई सभागृह लोकार्पण प्रसंगी केले.
कै. वासुदेव शांताराम नाईक यांच्या परिवारातर्फे दाते शांताराम नाईक यांनी वेंगुर्ला तालुका स्कूल नंबर 1 च्या वरच्या मजल्यावर निर्माण केलेल्या विठाई सभागृहाचा लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुणे ॲड. अजित भणगे यांच्या हस्ते शिलान्यास अनावरणाने 28 जुलै रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत शांताराम नाईक, वैशाली नाईक, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर, केंद्रप्रमुख श्री. आव्हाड, ठेकेदार अखिल आरोसकर यांचा समावेश होता. यावेळी उपस्थित मान्यवरांत उद्योजक दिगंबर नाईक, सिमा नाईक, ब्लू स्टार कंपनीचे सेवानिवृत्त मॅनेजर शशांक नाईक, सचिन बोवलेकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईक, नाईक ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्रीनिवास नाईक, विजया राय, टॅक्स कन्सल्टंट कुणाल नाईक, नितीन नाईक तसेच शालेय व्यवस्थापन समितीची उपाध्यक्ष सोनल राऊळ, माजी अध्यक्ष राजन केरकर, श्रीनिवास सौदागर, समीर परब, सुनील मराठे, तेजल तारी, स्नेहल बागुडे, गायत्री मिशाळे, बाळा कोरगांवकर, विनिता सामंत, संतोषी बागायतकर, सेजल रजपुत, शुभ्रा शिवलकर, जानवी तुळसकर, शिल्पा गावडे, चैताली कामत, शिक्षक गायत्री बागायतकर, लिना नाईक, प्रगती आव्हाड यांचा समावेश होता.
यावेळी शाळेच्या सभागृहाचे बांधकाम 25 दिवसांत पूर्ण करून देणारे ठेकेदार अखिल आरोसकर तसेच जलद काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नाईक परिवाराच्यावतीने सौ. मोना नाईक आणि नितीन नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात व्यासपिठासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत शांताराम नाईक, सत्यवान साटेलकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांनी केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांनी तर सूत्रसंचालन प्रशाळेच्या शिक्षिका सौ. रीमा मालवणकर यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी मानले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.