राष्ट्रसेविका समितीच्या आनंदी शाखेच्यावतीने सांस्कृतिक वार्तापत्राच्या ‘मातृप्रेरणा‘ या विशेष अंकाचे प्रकाशन नुकतेच कणकवली येथे प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अर्पिता आचरेकर यांच्या हस्ते व डॉ. बाळकृष्ण करंबेळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी कार्यवाह प्रतिभा करंबेळकर, मानसी आपटे, धनश्री मोरजकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सांस्कृतिक वार्तापत्रचे जिल्हा प्रतिनिधी विवेक मुतालिक यांनी वार्तापत्राची माहिती दिली. गौरी वाळके यांनी उपस्थितांना त्यांच्या आयुष्यातील प्रेरक कथा सांगितल्या. सौ. अळवणी यांनी अहिल्याबाई यांना सामुदायिक श्लोकातून आदरांजली वाहीली. मृणाल ठाकुर यांनी विशेषांकातील लेख मुलाखती याची माहिती देत अंक विकत घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले. प्रकाशस्थानी सवलतीतील अंकांची विक्री झाली. सूत्रसंचालन संपदा प्रभुदेसाई यांनी केले.