श्रावण महोत्सवांतर्गत नाम. दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत तसेच शाश्वत सेवा संस्था सिधुदुर्ग या संस्थेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून स्वामिनी मंडपम् येथे शालेय प्राथमिक व माध्यमिक शाळा या दोन गटांमध्ये नागोबा बनविणे तर बालवाडीसाठी नागोबा चित्र रंगविणे स्पर्धेत तिन्ही गटांत मिळून सुमारे ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन शिवसेनेचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर व वेंगुर्ला शहर प्रमुख महिला संघटक मनाली परब यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रावण महोत्सवाचे संयोजक दीपेश परब, शाश्वत सेवा संस्थेच्या अध्यक्ष मिताली मातोंडकर, शाश्वतच्या प्रतिनिधी दिव्या मांजरेकर, प्रा.वैभव खानोलकर, शहर संघटनेच्या महिला पदाधिकारी शिरोडकर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -प्राथमिक शाळा गट-प्रथम -काशिनाथ तेंडोलकर (मठ नं.१), द्वितीय-सहदेव मेस्त्री, तृतीय-अर्थव मेस्त्री (दोन्ही वेंगुर्ला नं.२), उत्तेजनार्थ- देवेन उडियार (मदर तेरेसा स्कूल) व दुर्वांक टेमकर (सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल), माध्यमिक शाळा गट-प्रथम-मकरंद वेंगुर्लेकर (पाटकर हायस्कूल), द्वितीय-प्रभाकर मेस्त्री (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), तृतीय-चिन्मय कुडपकर (देसाई इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ-वेदांत म्हापणकर व भाग्येश जाधव (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), बालवाडी गट (नागोबा रंगविणे स्पर्धा) -प्रथम-इशान उडियार (मदर तेरेसा स्कूल), द्वितीय-श्रीशा राऊळ (ज्ञानदा शिशूवाटीका,वेतोरे), तृतीय-सार्थक लांजेकर (शिवाजी प्राग. कॅम्प), उत्तेजनार्थ-युगांश उडियार व आयुष बागवे (एम.आर.देसाई स्कूल). परीक्षण जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन शाश्वत सेवा संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर यांनी केले.
कवितावाचन स्पर्धेत मानसी वाईकर प्रथम
बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ‘घननिळा‘ स्वरचित कवितावाचन स्पर्धा घेण्यात आली. खुल्या गटात मानसी वाईकर-प्रथम, प्रा.पी.जी.देसाई-द्वितीय, प्रा.वैभव खानोलकर-तृतीय तर प्रा.एस.जे.चुकेवाड व प्रा.व्ही.एस.चव्हाण यांनी उत्तेजनार्थ, शालेय गटात स्नेहा वेंगुर्लेकर-प्रथम, मेघा मयेकर-द्वितीय, कस्तुरी बगे-तृतीय तर सेजल रेडकर व गजानन गावडे यांनी उत्तेजनार्थ, तर महाविद्यालयीन गटात हर्षदा होडावडेकर-प्रथम, मंदार नाईक-द्वितीय तर भैरवी घाडी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले, शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर, पत्रकार दिपेश परब, प्रा.वामन गावडे, प्रा.पी.डी.गावडे, प्रा.वसंत नंदगिरीकर, प्रा.एस.जी.चुकेवाड आदींच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे परिक्षण प्रा.वसंत नंदगिरीकर व महेंद्र मातोंडकर यांनी केले. विजेत्या स्पर्धकांचे साहित्यिका वृंदा कांबळी यांनी अभिनंदन केले.
वक्तृत्व स्पर्धा- रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा.पी.आर.गावडे, प्रा.वसंत नंदगिरीकर, प्रा.वैभव खानोलकर, महेंद्र मातोंडकर, सुहास मांजरेकर, दीपेश परब, उज्जयनी मांजरेकर, प्रा.महेश बोवलेकर उपस्थित होते. स्पर्धेचा संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे – पहिली ते चौथी – तनिष्का केळुसकर, पाचवी ते आठवी – प्रथम -वरदा वेंगुर्लेकर, द्वितीय-इशा गिरप, तृतीय-चाहत शुक्ला, उत्तेजनार्थ-आदिती भुते व तनुष्का कुर्ले, नववी ते बारावी – प्रथम -रोशन केळुसकर, द्वितीय-अमृता नवार, तृतीय-दुर्वा गांवकर, उत्तेजनार्थ – रोशनी मोटे. स्पर्धेचे परीक्षण प्रा.वसंत नंदगिरीकर व प्रा.पी.आर.गावडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.महेश बोवलेकर यांनी केले.