महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री या योजनेचा लाभ तळागाळातील जनतेला होण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वयोवृद्धांचे वयोश्री योजनेचे अर्ज मोफत भरून त्यांना या योजनेचा लाभ देण्याबाबत केलेल्या सूचनांनुसार वेंगुर्ला शहर शिवसेनेतर्फे कॅम्प येथील दत्तराज नर्सरी येथे या योजनेचे फॉर्म मोफत भरण्यासाठीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचा शुभारंभ शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक सुहास मोचेमाडकर यांच्याकडे ८० जेष्ठ महिला व पुरुष नागरिकांचे अर्ज परिपूर्ण भरुन सादर करण्यात आले.
यावेळी शहर युवक प्रमुख संतोष परब, महिला शहर संघटक अॅड.श्रद्धा बाविस्कर-परब, मनाली परब, अल्पसंख्यांक महिला शहर संघटक शबाना शेख, शाहिस्ता शेख, सना शेख, प्रभाकर पडते, बाळा परब, संजय परब, राजू परब, यशवंत किनळेकर, किरण कुबल आदी उपस्थित होते. या शिबिरात लाभार्थ्यांचे अर्ज परिपूर्ण होण्यासाठी खास सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे तालुका समन्वयक सुहास मोचेमाडकर हे उपस्थित होते.