भाजपाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री‘चे फॉर्म वितरण

 ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्रीयोजनेचा लाभ मिळण्यासाठी भाजपा कार्यालयात मोफत फॉर्म वितरण मोहिम राबविण्यात आली. ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना फॉर्म देऊन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यात सुमारे १५० महिला व पुरुष जेष्ठ नागरिकांचे फॉर्म भरण्यात आले. दरम्यान, बार्टी संस्थेचे समता दुत सुहास मोचेमाडकर यांनी फॉर्म भरण्यासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी प्रसन्ना देसाई, मनवेल फर्नांडिस, वसंत तांडेल, वृंदा मोर्डेकर, पपू परब, शरद मेस्त्री, बिट्टु गावडे, पुंडलिक हळदणकर, नारायण गावडे, किशोर रेवणकर, छोटु कुबल उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu