‘त्या‘ कामातून कृषी सहाय्यकांना मुक्त करा

ई-पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वेचे आदेश रद्द करून त्या कामातून कृषी सहाय्यकांना मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या वेंगुर्ला शाखेतर्फे तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. ई-पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वेसाठी कृषि सहाय्यक यांना आदेशित करण्यात आलेले आहे. परंतु सध्या कृषि विभागाच्यादृष्टीने महत्वाचा खरीप हंगाम असल्याने या हंगामात शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, कृषि विभागाच्या विविध योजना राबविणे म.गा.रा.ग्रा.यो., पीएम

किसान योजनेच्या प्रलंबित कामांचा निपटारा करणे आदी महत्त्वाची कामे पूर्ण करणे अशी कामे चालू आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील एकूण ८४ महसूल गावातील सर्व कृषि विषयक कामकाजाची जबाबदारी फक्त ६ कृषि सहाय्यक सांभाळत आहेत. शिवाय गाव पातळीवर कृषि सहाय्यक हे पद तलाठी पदाच्या समकक्ष असूनही कोतवाल, ग्रा.पं. लिपिक, कर्मचारी, शिपाई यांचे बरोबर कृषि सहाय्यक यांना तलाठी यांचे सहाय्यक कर्मचारी म्हणून नियुक्त केलेले आहे. हे निश्चितच कृषि सहाय्यक पदाचे अवमूल्यन आहे. तरी वरील सर्व बाबींचा विचार करता कृषि सहाय्यक संघटना, तालुका वेंगुर्ला ई-पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वांचे आदेश अंत्यत विनम्रपणे व नाईलाजास्तव नाकारत आहे. तरी कृषि सहाय्यकांचे ई- पीक पाहणी डीजीटल क्रॉप सर्वेचे आदेश रद्द व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे लाडू जाधव, जीवन परब, प्रियांका देऊलकर, स्नेहल रगजी, राजू गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu