इनरव्हील क्लब वेंगुर्ल्याच्यावतीने ‘झाडे वाचवा, झाडे जगवा‘ या मोहिमेंतर्गत श्री शिवाजी प्रागतिक शाळेला सुपारीची झाडे क्लबच्या अध्यक्षा मंजुषा आरोलकर यांनी प्रदान केली. प्रारंभी मुख्याध्यापक वंदना शितोळे यांनी क्लबच्या सदस्यांचे स्वागत करून आपण दिलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे अभिवचनही दिले. यावेळी क्लब सदस्य सई चव्हाण यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. इनरव्हील क्लबच्या या सहकार्यामुळे शिक्षिका योगिता कोळसुलकर यांनी क्लबच्या सर्व पदाधिकायांचे आभार मानले.