कोकण कला व शिक्षण विकास संस्था व वेंगुर्ला भाजपा यांच्यातर्फे कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते वेंगुर्ला तालुक्यात गुणवंत विद्यार्थी तसेच १०० टक्के निकाल देणाया शाळा व ज्युनि. कॉलेजच्या मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजन तेली, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी.चौगुले, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य दिलीप गिरप, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, साईप्रसाद नाईक, निलेश सामंत, सुहास गवंडळकर, दादा केळुसकर, वसंत तांडेल, प्रशांत आपटे, श्रेया मयेकर आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांमध्ये कोकणची सर्वोत्कृष्ट असलेली गुणवत्ता दिसून येत नाही, ही सुद्धा एकप्रकारची खंत आहे. यावर उपाय म्हणून येत्या वर्षभरात कोकणातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची निर्मिती केली जाईल. पण सर्वचजण अधिकारी होणार नाहीत, त्यामुळे कौशल्याधारित शिक्षणाच्या नव्या आव्हानांना सामोरे होण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी सज्ज व्हायला हवे असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सचिन परूळकर यांनी तर आभार बाळू देसाई यांनी मानले.