रानभाजांच्या पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे ‘उत्सव रानभाज्यांचा 2024‘ अंतर्गत आयोजित केलेल्या रानभाजी पाककृतीमध्ये सेजल कालेकर, रानभाजी आणि भरड धान्य मिश्र पाककृतीमध्ये निता देसाई तर भरड धान्य पाककृती स्पर्धेत अश्‍वेता माडकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.

      येथील स्वामिनी मंडपम्‌ येथे 11 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन टांककर शेटये ट्रस्टचे विश्‍वस्त जनार्दन शेटये यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर ‘माझा वेंगुर्ला‘चे संजय पुनाळेकर, दिलीप गिरप, सचिन वालावलकर, परिक्षक प्रा. विवेक चव्हाण, डॉ.भूषण काळे आणि प्रा. डॉ. मनिषा मुजूमदार आदी उपस्थित होते. स्पर्धेचा संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे-रानभाजी पाककृती-प्रथम-सेजल कालेकर (टायकळा भाजीचे पराठे), द्वितीय-सानिका नाईक (रानभाज्यांचा पुलाव आणि शतावरीची इडली), तृतीय-विधी नाईक (सुरणाचे पॅटिस आणि चिप्स), उत्तेजनार्थ – दिव्या सुनिल गावडे (भरलेली करटोली), रानभाजी आणि भरड धान्य मिश्र स्पर्धा – प्रथम-निता देसाई (टायकळ्याची टिक्की आणि भरड धान्याचा पुलाव), द्वितीय – सुजाता साटम (औदुंबराच्या झाडावरील घरटे), तृतीय-वैजयंती राणे. (रानभाजी व भरड धान्य भाजी), उत्तेजनार्थ – वैष्णवी शिंदे (रानभाजी व भरड धान्य वडी), भरड धान्य पाककृती – प्रथम-अश्‍वेता माडकर (नाचणीच हेल्थ ड्रिंक्स), द्वितीय-प्राची गोरे (वरीचे गुलकंद मोदक), तृतीय-सई पोकळे (नाचणीचा केक चोको लवा), उत्तेजनार्थ-पूर्वा परब (नाचणी आणि वरीचे स्वीस रोल). या स्पर्धांचे परीक्षण प्रा.विवेक चव्हाण, डॉ.भूषण काळे आणि प्रा. डॉ.मनिषा मुजूमदार यांनी केले. विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 

Leave a Reply

Close Menu