वेंगुर्ल्याच्या ‘दायित्व‘ला राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार

निर्मिती फिल्म क्लबमार्फत कोल्हापूर येथे जून महिन्यात आयोजित केलेल्या लघुचित्रपट महोत्सवात वेंगुर्ल्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर आधारित विद्धेश आईर निर्मित, मनोहर कावले दिग्दर्शित आणि नाईक ॲग्रो पुरस्कृत ‘दायित्व‘ हा लघुपट अथर्व मराठी युट्यूबच्या माध्यमातून प्रस्तुत केला होता. या लघुपटाला आशय, विषय आणि लघुचित्रपटाचा दर्जा पाहून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या पुरस्काराने नवोदित कलाकारांची खाण असलेल्या वेंगुर्लेवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पुरस्काराबद्दल लघुचित्रपट बनविणाऱ्यांसह कलाकारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे, खराब रस्ते त्यातून लोकांना होणारा त्रास यावर आधारित या लघुचित्रपटाची कथा आहे. यात ‘वेतोबा‘ मालिकाफेम नमिता गांवकर (मालवण), वेंगुर्ला रोटरी क्लबचे प्रेसिडेंट योगेश नाईक, सुहास मांजरेकर, डॉ.भक्ती भिसे-कांडरकर, रघुनाथ कुडपकर, दिनेश पालव, सुहासिनी परब, वैभवशाली कावले, शर्मिला पालव, बाल कलाकार कारूण्या परब, नरहरी खानोलकर आणि वेंगुर्ल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी रमेश नार्वेकर या कलाकारांनी भूमिका साकारली आहे.

Leave a Reply

Close Menu