‘माझी वसुंधरा अभियान ५.०‘ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४‘ अंतर्गत वेंगुर्ला न.प.मार्फत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी देशी प्रजातींच्या ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. निशाण तलाव परिसरामध्ये १०० बांबूच्या रोपांची, कॅम्प येथील नवीन म्हाडा वसाहत शेजारील मैदान, दाडाचे टेंब स्मशानभूमी, आनंदवाडी स्मशानभूमी, धावडेश्वर स्मशानभूमी परिसरात बांबू, खैर, जांभुळ, शिवण अशा ४०० रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात न.प.चे कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते. वैभव म्हाकवेकर व सागर चौधरी यांनी वृक्ष लागवड मोहिमेचे सूक्ष्म नियोजन केले.