गेल्या १५ वर्षात सावंतवाडी मतदार संघातील नागरिकांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय या भागाच्या विकासास निवडून दिलेल्यांकडून झालाय. आम्ही आपल्या गावी आपल्या वाडीवर, वस्तीवर, आपल्या हक्काचा जागर करण्यासाठी आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी जाणीव जागरण यात्रेच्या निमित्ताने येत आहोत. या भागात आरोग्यसेवा, रोजगार वशेतमालाला हमीभाव देण्या -साठी आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन कोकण राष्ट्रवादी महिला अध्यक्ष (शरद पवार गट) अर्चना घारे-परब यांनी जाणीव जागृती यात्रेच्या वेंगुर्ला शहरातील शुभारंभप्रसंगी केले. या रॅलीला वेंगुर्ला शहर, उभादांडा, दाभोली, खानोली, वेतारे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, विधानसभा महिला अध्यक्ष नीतिशा नाईक, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, जिल्हा सदस्य नितीन कुबल, शहर कार्याध्यक्ष सुहास कोळसुलकर, सरचिटणीस सलील नाबर, तालुका उपाध्यक्ष विशाल बागायतकर, शहर सचिव स्वप्नील रावळ, युवती तालुका अध्यक्ष अदिती चुडजी, शहर अध्यक्ष अपूर्वा परब, अल्पसंख्याक महिला तालुका अध्यक्ष मारित फर्नांडिस, विवेक गवस, ऋतिक परब, पूजा दळवी, मनोज वाघमोरे, सावंतवाडी विधानसभा समन्वयक राजू भगत, बबन पडवळ, अवधूत मराठेंसह पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.
आमची महाविकास आघाडी घट्ट आहे. इंडिया आघाडीच्या उमेदवार म्हणूनच अर्चना घारे-परब यांना विधानसभेच्या मैदानात उतरवणार आहोत. आमचा लढा हा अन्याय, अत्याचार आणि आजपर्यंत विकासापासून दूर ठेवणाया व केवळ घोषणा बाजी करणाया विद्यमान आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या विरोधात आहे. सुज्ञ मतदार आता नक्कीच जागर रॅलीच्या माध्यमातून अंतर्मनातून जागृत होतील व आम्हला साथ देतील अशी अपेक्षा प्रविण भोसले यांनी व्यक्त केली.