कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी पुरस्कृत श्रावण महोत्सवांतर्गत वेंगुर्ला-नगरवाचनालय येथे शिवसेना वेंगुर्ला व शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या राधा, कृष्ण वेशभूषा स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात ४७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. बालवाडी गटामध्ये प्रथम-सार्थक लांजेकर, द्वितीय-प्राप्ती मोरे, तृतीय-इशान उडियार, उत्तेजनार्थ-कावेरी परब व युगांश उडियार, प्राथमिक गटात प्रथम-प्रांजल नार्वेकर, द्वितीय-स्वरा काणेकर, तृतीय-अवनी कुबल, उत्तेजनार्थ-प्रणाली जगताप, तेजश्री लांजेकर, माध्यमिक गटात प्रथम-महिमा नार्वेकर, द्वितीया-लावण्या पेडणेकर, तृतीय-नैतिक नाईक, उत्तेजनार्थ-युगा मातोंडकर व सेजल साळगांवकर यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ दशावतारी कलावंत महेश गवंडे यांनी केले. तर बक्षीस वितरण उमेश येरम, मनाली परब, महेश गवंडे, प्रभाकर पडते, मिताली मातोंडकर, दीपेश परब, दिव्या मांजरेकर यांच्या उपस्थितीत झाले. सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी तर आभार महेंद्र मातोंडकर यांनी मानले.