मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला येथील श्री सातेरी व्यायामशाळेत आशिया श्री विजेता, अनेक किताबांचा मानकरी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुहास खामकर याच्या ‘खेळाडू ते सिने पदार्पण‘ या सन्मानार्थ त्याच्या नविन ‘राजविर‘ या सिनेमाचे पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तर सातेरी व्यायामशाळेतील उल्लेखनीय क्रीडापटूंचा आंतरराष्ट्रीय बॉडबिल्डर मेन फिजिक खेळाडू मिस्टर वर्ल्ड मंगेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यात ‘सिधुदुर्ग श्री‘ विजेते संतोष परब, हेमंत चव्हाण, संतोष किर, आंतरराष्ट्रीय खेळाडू अंकिता सोनसुरकर, कुस्ती खेळाडू मनोहर कावले, जलतरणपटू हिमांशू उबाळे, ‘खर्डेकर श्री‘ विजेते मनिष सातार्डेकर, व्यायामपटू निनाद दिपनाईक, विद्धेश आईर यांचा समावेश होता. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र कामगार श्री विजेते किशोर सोनसुरकर, व्यायामपटू वैशाली झोटे आदी उपस्थित होते.