ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक रक्कमी ३ हजार रूपये बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री यजना‘ राबविण्यात येत आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यातून या योजनेसाठी १० हजार ६०० अर्ज दाखल झाले आहेत. राज्यातून सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजेच १ लाख २९ हजार ८१२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत राज्यातील अर्जांपैकी ६ लाख ३१ हजार एवढ्या अर्जांना मंजूरी देण्यात आली असून उर्वरित अर्जांची पडताळणी सुरू आहे.