बाल मानसशास्त्र जपत लहानग्यांना आपलेसे करत संस्काराची शिदोरी आणि अक्षर ओळख देत प्रसंगी शासनाच्या विविध योजना राबविण्याचे कार्य अविरतपणे अंगणवाडी ताई आणि सेविका करीत आहेत. अशा सर्व आजी-माजी अंगणवाडी ताई आणि सेविका यांच्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या -वतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या सहकार्याने ‘बाल संस्कारः काळाची गरज‘ यावर घेण्यात आलेल्या खुल्या निबंध लेखन स्पर्धेत एकूण ६९ महिलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम-संस्कृती वारंग (घावनळे), द्वितीय- शुभलक्ष्मी पडते (वजराट), तृतीय-गौरी तुळसकर (तुळस), उत्तेजनार्थ-सायली मसुरकर (वायंगणी), विनिता कांबळी (आजगांव). स्पर्धेचे परिक्षण प्रा.डॉ.पी.आर.गावडे यांनी केले. विजेत्यांना लवकरच रोख पारितोषिक, चित्रफ्रेम, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.