एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग (नागरी) अंतर्गत मालवण बीट तर्फे वेंगुर्ला-कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. दरम्यान, यावेळी वेंगुर्ला शहरात काढण्यात आलेल्या पोषण रॅलीच्या माध्यमातून आहार व आरोग्यविषयी घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.
दि. १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त श्री शिवाजी प्रागतिक शाळेमध्ये पाककला स्पर्धा, गोपाळ पंगत व पोषण रॅली आदी उपक्रम घेण्यात आले. फळे, भाज्या व कडधान्य यांचे आहारातील महत्त्व याविषयी जनजागृती करण्यात आली. अंगणवाडीतील मुलांच्या पालकांनी टी.एच.आर.पासूनही विविध पाककृती बनवून आहारातील महत्त्व विशद केले. पोषण रॅलीमध्ये मुख्याध्यापक शितोळे, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी तसेच मालवण बीट मधील ७ अंगणवाड्यांच्या सेविका व मदतनीस यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील अंगणवाडी सेविका, मदनीस आणि बीटच्या मुख्य सेविका साधना पागी यांनी परिश्रम घेतले.