हिदी प्रचार सभा वेंगुर्ला मार्फत हिदी दिनानिमित्त आदर्श शिक्षक व शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या पुरस्कारांचे वितरण नुकतेच वेंगुर्ला येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते झाले. बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांना मधुस्मिता माधव अभ्यंकर यांच्या देणगीतून दिला जाणारा कै.श्री.श्रीपाद कृष्ण पुराणिक स्मृती आदर्श हिदी शिक्षक पुरस्काराने तर अनिल श्रीकृष्ण सौदागर यांच्या देणगीतून दिला जाणारा कै.सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श हिदी शिक्षिका पुरस्कार वेंगुर्ला शाळा नं.२च्या शिक्षिका नीना मार्गी यांना देऊन सन्मानीत करण्यात आले. याच कार्यक्रमात बालबोधिनी, प्राथमिक, प्रवेशिका व सुबोध परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या २४ विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान तर १५ परिक्षा शिक्षकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हिदी ही आपल्या देशाची राजभाषा आहे. त्यामुळे सर्वांना ती व्यवस्थीत बोलता आली पाहिजे असे मत वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायीक संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विशाखा वेंगुर्लेकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय संस्था सदस्य कैवल्य पवार यांनी केले. संस्था अध्यक्ष का.हु.शेख यांनी संस्थेची सविस्तर माहिती दिली. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वीरधवल परब, भाऊ करंगुटकर, माया परब, मेहंदी बोवलेकर, समृद्धी पिळणकर, रामा पोळजी, साक्षी वराडकर, रिमा मालवणकर, प्रिती गावडे, सौ.नंदगिरीकर यांसह पाटकर हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, हिदीप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यवाह प्रा.महेश बोवलेकर यांनी तर आभार सदस्य सत्यवान पेडणेकर यांनी मानले.